मराठा आरक्षण मोर्चास जात असताना आमदार समाधान आवताडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - दैनिक शिवस्वराज्य

मराठा आरक्षण मोर्चास जात असताना आमदार समाधान आवताडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात



सलिम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी

सोलापूर . सोलापुरात मराठा आरक्षण मोर्चासाठी जात असताना सोलापूर रोडवरील देगाव याठिकाणी आमदार समाधान (दादा )आवताडे यांच्यासह माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात सोलापुरात सकल मराठा समाजाचा आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती. हा मोर्चा सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला होता.
या मोर्चासाठी आ समाधान आवताडे तसेच माजी मंत्री प्रा लक्ष्मणराव ढोबळे, राजेंद्र पाटील ,पप्पू स्वामी ,औदुंबर वाडेकर ,दिपक सुडके, माऊली कोंडूभैरी,हर्षद डोरले संभाजी घुले ,गणेश गावकरे, दिगंबर यादव, यांच्यासह काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads