महाराष्ट्र
दत्तात्रय गजभार यांचा सेवानिवृत झाल्या निमित्त सत्कार
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
दक्षिण सोलापूर : कासेगाव येथिल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री .दत्तात्रय गजभार हे श्री.मार्कडेय प्रशाला जुळे सोलापूर येथे ३९ वर्ष सेवा करुन मे २०२१ मध्ये सेवानिवृत झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस भवन सोलापूर येथे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री दत्तात्रय गजभार हे चिकाटीचे व जिद्दी व्यक्तीमत्व आहे ते शाळेत नौकरी करित असताना स्वताःची शाळा काढावी असे त्याना वाटले त्यांची परिस्थिती नसताना शाळा काढली व ती व्यवस्थित पणे चालविली हे कौतुकास्पद आहे आसे काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शेळके म्हणाले .
यावेळी माजी आमदार धनाजीराव साठे ,उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे प्रा.डाॕ.सिद्राम सलवदे,शहर सेवादलाचे माजी अध्यक्ष अशोक कलशेट्टी, रसिदभाई शेख,विनोद रणसुरे , डुमणे सर,शिवाजी चापले सर ,कवले सर,उत्तमकुमार वाघमारे, कुंडलीक जाधव आदि उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा