दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२
मी... ऋतुजा सुभाष चिखले
सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच View व Share करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती...
स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे...
आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे.....
स्पर्धेची बक्षिसे :-
प्रथम क्रमांक :- १०००००/- फक्त
द्वितीय क्रमांक :- ७५०००/- फक्त
तृतीय क्रमांक :- ५००००/- फक्त
चतुर्थ क्रमांक :- २५०००/- फक्त
पाचवा क्रमांक :- १५०००/- फक्त
सहा ते दहा क्रमांक :- ५०००/- प्रत्येकी
अकरा ते शंभर क्रमांक :- १०००/- प्रत्येकी
तुम्हाला या स्पर्धेत भाग घ्यायचा असल्यास खालील क्रमांकावर प्रवेश फी Google Pay किंवा Phone Pay च्या माध्यमातून पाठवा आणि या नंबरला Whatsapp ला स्क्रीनशॉट पाठवा व तुमचा प्रवेश फिक्स करा.
प्रवेश फी :- १५० रुपये फक्त
Whatsapp क्रमांक :- 8007613469
आपला नम्र
ऋतुजा सुभाष चिखले
निबंधाचा विषय : छत्रपती शिवाजी महाराज
मंदिर थरारली , शिवनेरीची तोफ कडाडून
वाऱ्याची कोवळी झुळूक दऱ्या खोऱ्यात दरवळला...
जिजाऊ पोटी मराठयाचा राजा अवतरला सांगत मुक्ति
पाखरं हि किलबिलली...
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरावर सांगत सुटला, आता सहयाद्रीवर
भगवा फडकणार ...!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार...
इतिहासाच पहिल पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगव रक्त स्वराज्याचा
इतिहास कोरत आहे.
युगपुरुष, स्वराज्य संस्थापक, रयतेचा राजा, छत्रपती अशा एक ना अनेक उपाधी ज्या महापुरुषाला प्राप्त झाल्या आहेत ते दुसरे तिसरे कोणीही नसून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले आहेत. शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे शिवराय हे संपूर्ण देशासाठी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श आणि प्रजादक्ष राजा मानले गेले आहेत. अशा या कतृत्त्वशाली व्यक्ति मत्त्वाचा जन्म फाल्गुन वदय तृतीया शके १५५१ या दिवशी म्हणजेच १६३० रोजी शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे मालोजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले.शिवरायांचे बालपण राजमाता जिजाऊ यांच्या सानिध्यात गेले. शहाजीराजे स्वत: सरदार असल्याने त्यांचे साथीदार ही तेवढेच कुशल, हुशार आणि लढाऊ वृत्तीचे होते. राजमाता जिजाऊ आणि इतर विश्वासू कर्तबगार मंडळी यांचे सानिद्य सतत शिवरायांना लाभत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व हे चांगल्या संस्कारांनी भारलेले होते.
"वाघाच्या छाव्याला " सांगायची गरज न्हाय ,
जय शिवाजी म्हटलं तर... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठयांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
तीन्ही लोकी "जय शिवराय " हा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
शिवाजी महाराज अवघे १४ वर्षाचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. शिवरायांच्या मनात कतृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली, शूर वीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले अशा या संस्कारामुळे शिवाजीराजे घडले. शिवाजी महाराज जेव्हा पुण्याचा कारभार पाहत होते तेव्हा त्यांनी राजमुद्रा तयार केली. हि राजमुद्रा संस्कृत भाषेत होती.
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिषणुर्विश्वदिता शाह सुनो;
शिवरयैषा मुद्रा शद्राय वाजता".
या राजमुद्रेचा मराठी अर्थ असा की, जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि, साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची हि राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. शिस्तबद्ध सैन्य आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले. इ. स १६४० मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला. इ. स १६४५ मध्ये शिवरायांनी आदिलशहाच्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूचा तोरणा, सिंहगड, पुरंदर, या किल्यांचा ताबा घेतला होता.
दवेत झोप घ्यायची असेल तर
पक्षासारखी बळ हव ...
दरीत झोप घ्यायची असेल तर
आकाशाएवढ धाडस हव...
पाण्यात उडी घ्यायची असेल तर
माशा सारखी कला हवी...
अन् साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर " शिवबाचच" काळीज हवं.
महाराजांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस एक ठराविक जबाबदारी देण्यात आलेली. महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती. त्यांनी चौथे आणि सरदेशमुखी ह्या दोन प्रकारच्या कर पद्धतीची सुरुवात केली. आणि प्रत्येक विभाविभागाचा प्रमुख मामलतदार असे त्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि कायम स्त्रियांचा आदर करत. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे सैनिक होते. आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबाबत खूप सावध होते. त्यांना गड किल्यांची ताकद माहिती होती म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतामध्ये खूप कल्ले उभारले. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षा करण्यासाठी समुद्री किल्ले आणि आरमार हि उभारले.मुघलांच्या ताब्यात असलेले गड किल्ले परत मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात केली, त्यांच्याशी सहमत असलेल्या समवयस्क तरुणांन सोबत केली. १९४५ मध्ये शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह आदिलशाहीच्या कोंढाणा किल्यावर हल्ला करून त्याला जिंकून घेतले. या नंतर आदिलशाहीच्या सेनेन शहाजी राजांना बंदी बनून घेतले.
शिवरायांना कोंढाणा सोडण्याची मांग केली. वडिलांना वाचवण्यासाठी त्यांना कोंढाणा सोडावा लागला. शहाजी राजाच्या मुक्ततेनंतर १६४५ सालीच त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी परत आक्रमण सुरू केले.
श्वासात रोखून वादळ, डोळयात रोखली आग,
देव आमुचा छत्रपती, एकच हिंदू वाघ,
हातात धरली तलवार,छातीत भरले पोलाद,
धन्य- धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज!!
इ. स १६४७ मध्ये सतरा वर्षाच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणा गड जिंकला आणि स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजी महाराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पुर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणागडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी रायगड असे ठेवले. ६ जून इ. स १६४७ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्यभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवाय हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी - संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकूम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले.
थोर तुमचे कर्म राजे,
उपकार कधी फिटणार नाही,
चंद्र, सूर्य असेपर्यंत नाव तुमचे,
मनामनातून मिटणार नाही
शिवरायांनी आरमार व्यवस्था, सुयोग्य कर वसुली, गड किल्ले सुरक्षा आणि विविध पर्यावरणीय मोहिमा राबवल्या. स्वराज्याचा पहिला छत्रपती म्हणून शिवराय हेच रयतेकडून सर्वसामान्य झाले होते. शिवरायांची गाथा संपूर्ण भारत वर्षात दुमदुमत होती. अशा या वीर पुरुषाची प्राणज्योत अखेर रायगडावर ३ एप्रिल १६८० रोजी मावली.संपूर्ण जीवन एक धगधगती ज्वाला आणि संघर्ष बनवणारा, स्वराज्य निर्मितीसाठी आणि लोकहितासाठी स्वत:चे जीवन पणाला लावणारा असा नरवीर, पराक्रम, राष्ट्रपुरुष भूमीत जन्माला आला आणि मातृभूमी धन्य करुन गेला. असा राजा पुन्हा होणे नाही. राजा शिवछत्रपती एकच होता, एकच आहे आणि एकच राहिल.
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला,
वाघ नव्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानाने नवीन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक "मर्द मराठा " शिवबा" होऊन गेला, ".
❤❤
उत्तर द्याहटवा