अपघातात जखमी झालेल्या युवकास यतीन शहांनी दिला मदतीचा हात - दैनिक शिवस्वराज्य

अपघातात जखमी झालेल्या युवकास यतीन शहांनी दिला मदतीचा हात



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

सोलापूर (मंदूप)  दि.१३: दक्षिण सोलापूर  तालुक्यातील लंवगी येथील सिध्दाराम बाबु कांबळे (वय 22) या युवकाचा  दि.9 जुन रोजी अपघात झाला.
  यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर सोलापूर येथील स्पर्श हाॅस्पिटलमध्ये एक महिन्यापासून उपचार चालू आहे.         सिध्दाराम कांबळे हा मंद्रुप येथील संतोष भिमराव पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असुन सध्या तो दयानंद काॅलेज सोलापूर येथे एम.काॅम पदव्युत्तरात शिक्षण घेत आहे.
 सिध्दाराम हा हुशार आणि गुणी असुन त्याला उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आहे.त्याची घरची परिस्थिती अंत्यत नाजूक आहे.यात त्याचे वडील सुध्दा हयात नाहीत.
      सध्या त्याची प्रकृती स्थिर असुन त्यांच्यावर डाॅ.आनंद मुदकण्णा यांच्याकडून यशस्वी उपचार चालु आहेत
        भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस यतीन शहा यांनी सिध्दाराम कांबळे याची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. प्रकृतीची चौकशी केली. याशिवाय यतीध शहा यांनी १० हजार रुपये आर्थिक मदत करुन मदतीचा हात दिला आहे. 
       यावेळी तेलगांवचे माजी सरपंच श्रीशैल पाटील,अमसिध्द कांबळे,धरेप्पा तेली,बसवराज मुक्काणे,गंगाधर बगले उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads