महाराष्ट्र
प्राईड इंडिया कंपनीकडून वावळौली गावात फळजाड वाटप
प्रतिनिधी रवी यादव :-
सूधागड तालुक्यातील सीद्देश्वर ग्रामपंचायत हद्दीतील वावळौली गावात प्राईड इंडिया कंपनीकडून फळझाडे वाटप करण्यात आले. यावेळी महानगर गैस लिमिटेडचे अधिकारी प्राईड इंडियाचे प्रोग्रॅम कोऑर्डीनेटर श्री मोकल मोरे सर उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच उमेश यादव, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ताराबाई सपकाळ व ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच उमेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. गावातील नागरिकांकडून प्राईड इंडिया कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्याकडून भविष्यात असेच उपक्रम आयोजित केले जावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा