महाराष्ट्र
शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान सावर्डेने दिला पुरग्रस्तांना मदतीचा हात
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते , तेव्हा त्याच्या चेहर्यावर समाधान असते.या समाधानाच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी शिक्षक मित्र प्रतिष्ठान सावर्डे यांनी आपदग्रस्त लोकांसाठी मदतीचे आवाहन केले होते.कर्तव्यपरायण आमदार मा श्री शेखरजी निकम साहेब यांनी या संस्थेला पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. प्रतिष्ठानप्रती विश्वास व्यक्त करत मुंबई-पुणे पासुन परदेशातील कोकणवासीयांनी या प्रतिष्ठानला भरभरून आर्थिक मदत केली. या आर्थिक मदतीतून आपत्तीग्रस्तांसाठी विविध जीवनावश्यक विविध वस्तू खरेदी करून त्याचे कीट बनवून लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले.
या संस्थेच्या माध्यमातून जवळ जवळ साडेतीनशे आपद्ग्रस्त कुटुंबात पर्यंत पोहोचून त्यांना लागणारे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप प्रत्यक्षपणे जाऊन करण्यात आले. सदर किट मध्ये किराणा साहित्य, दोन चादर, दोन टॉवेल, ब्लॅंकेट , बादली, मग, चटई महीलांसाठी साडी, परकर , तांदूळ , आटा तसेच इतर दैनंदिन वापराचे विविध साहित्य या वस्तूंचा समावेश होता.
चिपळूण येथे आपत्ती आल्यानंतर सातत्याने ७/८ दिवस शिक्षक मित्र प्रतिष्ठान सावर्डे या संस्थेचे सदस्य यांनी विविध माध्यमातून मदतीचे सेवाकार्य सुरू ठेवले आहे.
विषेश म्हणजे आंबतखोल, ता.चिपळूण येथील ग्रामसंघाच्या गावातील सर्व सामान्य कुटुंबातील सुमारे पंधरा बचत गटांनी एकत्र येऊन या संस्थेच्या समाज कार्यावर विश्वास ठेवून मानवतावादी दृष्टीकोनातून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या खांद्याला खांदा लावून मदतीचे कार्य केले. या महिला बचत गटांमध्ये 35 ते 40 महिला स्वतः साहित्य वाटपासाठी उपस्थित होत्या. त्यांचे कार्य प्रेरणादायी होते.
या संस्थेला आर्थिक आणि वस्तुरूप मदत करणाऱ्या अनेक हातांचा विश्वास सार्थ ठरवत प्रत्यक्ष आपत्तीग्रस्तांना पर्यंत पोहोचून कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. कावीळतळी, नवीन कोळकेवाडी, खांदाटपाली, खेर्डीतील माळेवाडी, शिगवण वाडी, अशोक नगर, दातेवाडी, देऊळवाडी येथील या परिसरातील कुटुंबांचे प्रत्यक्ष भेट घेऊन एक हात मदतीचा या उद्देशाने मदतीचे कार्य केले.
अजूनही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपत्तीग्रस्तांना अधिकची मदत देण्याचे नियोजन सुरू असून, संस्थेच्या माध्यमातून सुमारे ४ लाख रुपयापर्यंतचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर यांनी सांगितले.
सदर वाटप करताना संस्थेचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर, उपाध्यक्ष उद्धव साळवी, सचिव अरविंद भंडारी, कार्याध्यक्ष प्रकाश ठोंबरे, खजिनदार सुरेश बागवे, सहखजिनदार मनोजकुमार घाग,सहसचिव विजय सावंत, प्रसिद्धीप्रमुख संजय घाग, संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार दशरथ बांबाडे, बाबाजी मते, संभाजी निर्मळ, सुधीर डिके, चंद्रशेखर राऊत दीपक खुनम, दिलीप बुदर, प्रकाश गांधी, विलास मोहिते ,प्रविण वणे,अविनाश जाधव, विश्वास सोनवलकर, बाबुराव सोळंकी, विशाल मगर,दशरथ निमूणकर उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा