सोलापूर ग्रामीण मध्ये कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर ग्रामीण मध्ये कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू



 समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी 

सोलापूरदि.29 : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतताकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 28 नोव्हेंबर 2021  ते 12 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जारी केले आहेत. हे आदेश 28 नोव्हेंबर 2021 रोजीच्या सकाळी 8 वाजेपासून ते 12 डिसेंबर 2021 रोजीच्या रात्री 20.00 वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

            या आदेशानुसार शस्त्रेझेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईलअशी कोणतीही वस्तू बरोबर नेणेकोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणेव्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्राप्रतिमा यांचे प्रदर्शन करणेसार्वजनिक घोषणा करणेअसभ्य हावभाव करणेग्राम्य भाषा वापरणेसभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातीलत्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होवून शांततेस बाधा होईलसोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे,तसेच पाच किंवा पाचहून जास्त लाक एकत्र येण्यास बंदी घालत आहे.

            हा आदेश अत्यावश्यक सेवातसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारीपोलीस अधीक्षक (ग्रा.)उपविभागीय दंडाधिकारीउपविभागीय पोलीस अधिकारीपोलीस निरीक्षकदुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत. 

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads