महाराष्ट्र
सात रस्ता येथील सोलापूर महानगरपालिका परिवहनची उपक्रमाची आरक्षित जागा पेट्रोल पंपास देण्यास विरोध, जागा भाड्याने द्यायचेच असेल तर लिलावाद्वारे द्या :-परिवहन सदस्य तिरूपती परकीपंडला यांची मागणी
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर दि. ३० नोव्हेंबर :- सात रस्ता येथील सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाची अत्यंत मोक्याची जागा कुठलेही भाडे ठरले नसताना सोमपा उपायुक्तांनी पेट्रोलपंप साठी ताब्यात देण्याचे आदेश दिले आहे त्यासाठी आम्ही कॉंग्रेस पक्षाचे परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, व गणेश साळुंखे विरोध करत आहोत. जागा भाड्याने द्यायचेच असेल तर उत्पन्नवाढीसाठी लिलावाद्वारे द्या अशी मागणी सोलापूर महापालिकेत झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत केली.
सोलापूर महापालिकेत जनरल बोर्डात सोलापूर परिवहन उपक्रमासाठी आरक्षित असलेली जागा पेट्रोल पंपासाठी द्यायला ठराव सोलापूर महापालिकेच्या जनरल बोर्डात ठराव झाला. आणि परिवहन उपक्रमाला पाच दिवसात जागा खाली करून ताब्यात देण्याचे आदेश उपायुक्त यांनी परिवहन उपक्रमाला दिला. पण या विषयावर कुठलीही चर्चा झाली नाही, भाडेही ठरले नाही, पेट्रोल पंप कोण चालवणार हे ही उल्लेख नाही. पण ही जागा परिवहनसाठी आरक्षित असल्यामुळे कोणालाही भाड्याने अथवा विक्री करता येत नाही.
एकीकडे सोलापूर महापालिकेच्या वतीने शहरातील खुल्या जागेचे लिलावाद्वारे भाड्याने देत आहेत त्यासाठी लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दहा बाय दहा जागेसाठी 15 ते 20 हजार भाडा मिळत असताना सात रस्ता येथील अत्यंत मोक्याची पंधरा हजार स्केअर फूट जागा कुठलेही भाडा ठरलेले नसताना पेट्रोल पंपासाठी जागा ताब्यात देण्याचे आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही परिवहन समितीचे सदस्य तिरुपती परकीपंडला, व गणेश साळुंखे विरोध करत आहोत.
जर जागा भाड्याने द्यायचेच असेल तर महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी लिलावाद्वारे देण्यात यावी जेणे करून परिवहन कर्मचाऱ्यांचे थकीत देणे, फंड, कोर्टात असलेले केसेस यांचे देणे देता येईल सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होईल.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा