सामाजिक
बरूर ता.द.सोलापूर येथे उमेद अभियानंतर्गत ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर : बरूर ता.द.सोलापूर येथे उमेद अभियानंतर्गत ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले. यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार व व्दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. व या कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेद अभियानाचे व्यवस्थापक प्रदीप बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशोदरा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता कोलूर, उमेद अभियानाचे अधिकारी यशपाल गायकवाड व दिगंबर साळुंखे तसेच बरूर गावाचे सरपंच शोभा ताई टेळे, प्रेमा चनगोंडा हवीनाळे,अलिम शेख, राजश्री येणगुरे,पंचशीला कसबे व बरूर उपसरपंच मल्लिकार्जुन नंद्राळे व ग्राम पंचायत सदस्य तम्माराया मकणापुरे , सुनिता ख्याडे, अखिल कुडले, उमेद अभियानात सीआरपी म्हणून काम करणारे रेणुका रगटे, रेणुका भासगी, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. परीट, प्रदीप टेळे, अखिल भारतीय किसान सभेचे तालुका सचिव श्रीमंत डोमनाळे, शांतकुमार शिंदे ,ग्रामपंचायत कर्मचारी सद्दाम मकानदार, झाकीर मुल्ला,हासिना मकानदार, श्री शक्ति ग्रामसंघाचे अध्यक्ष यलूबाई कंदगल, सचिव निर्मला कनशेट्टी, कोशाध्यक्ष सावित्री मुळगे, लिपिक काजल पठाण व जीवनज्योती ग्रामसंघाचे अध्यक्ष धानेश्वरी ख्याडे, सचिव पुजा स्वामी, लिपिक कोमल स्वामी, कविता चौगुले,बँक सखी आफ्रिन पटेल व पुजा माळी,प्राथमिक शाळेचे शिक्षक कोळी सर आणि बचत गटातील सर्व सदस्य महिला व आशा वर्कर स्वाती वाघमोडे यावेळी उपस्थिती होते.
या ग्रामसंघाचे उद्देश महिलांना स्वावलंबी व सवंयरोजगार उपलब्घ करून देण्याचा आहे असे दिगंबर साळुंखे याने आपले मनोगतात व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे प्रस्तावना स्वाती वाघमोडे याने केले व सर्व महिला बचत गट सदस्यांना स्वयरोजगार उपलब्ध करून देण्यात ग्रामसंघ सदैव प्रयत्नशील राहील असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहिलेले यशोदरा हॉस्पिटल चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता कोलूर यांनी आपले मनोगतात महिलांचे आरोग्यविषयी रक्तदाब व विम्यासंबधित माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री कोळी सर याने केले.तसेच आभार प्रदर्शन हासिना मकानदार याने केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा