बेपत्ता मुलीची माहिती मिळाल्यास एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशनला संपर्क साधावा
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी सोलापूर, दि.30 :- एमआयडीसी पोलिस स्टेशन बेपत्ता रजिस्टर नंबर 154/2021 मधील खबर देणार राजकुमार रेवणसिध्द पाटील, वय – 40 वर्ष , राहणार अक्कलकोट नाका, घर नंबर 100 गांधीनगर, सोलापूर यांनी अर्ज दिला की, त्यांची मुलगी प्रेरणा राजकुमार पाटील, वय- 18 वर्षे, दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 8.00 वा कोणास काही न सांगता राहत्या घरातून निघुन गेली आहे व जाताना सोबत 1 लाख रुपये रोख रक्कम तसेच 2 तोळे सोने घेऊन गेली आहे. वरील नंबरने एमआयडीसी पोलिस ठाणे येथे बेपत्ता खबर दाखल आहे.
बेपत्ता मुलीचे वर्णन - नांव- कु. प्रेरणा राजकुमार पाटील, वय – 18 वर्ष , राहण्र गांधीनगर,जु. अक्कलकोट नाका, घर नंबर 100, सोलापूर, उंची- 5 फूट, रंग- गोरा, भाषा- मराठी व हिंदी, शिक्षण- 12 वी, कपडे- काळी जीन्स करड्या कलरचा टॉप, चेहरा-गोल, कपाळ- मोठ, बांधा- सडपातळ.
तरी उपरोक्त बेपत्ता स्त्रीची माहिती कोणत्याही नागरीकास कळाल्यास एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन दूरध्वनी क्रमांक 0217/2744690 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन, सोलापूर शहर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा