महाराष्ट्र
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्यावतीने आयोजित अभियानांतर्गत ५९४ मतदार नावनोंदणी..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनधी
सोलापूर (मंद्रूप) : दक्षिण सोलापूर येथील मंद्रुपमध्ये गेल्या काही दिवसापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने मतदार नाव नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या अभियानाअंतर्गत आतापर्यंत एकूण ५९४ मतदार नाव नोंदणी करून नागरिकांनी या अभियानाचे लाभ घेतला आहे.या अभियानाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष सागर तांबोळकर,द.सोलापूर तालुका अध्यक्ष अरविंद राठोड, मंगळवेढा तालुका अध्यक्ष सागर यादव यांनी परिश्रम घेतले.या अभियान यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अनमोल केवटे यांनी मार्गदर्शन केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा