महाराष्ट्र
सोलापुर दक्षिणचे भूमिपुत्र राशिद शेख यांना महामंडळावर संधी मिळेल का ? अल्पसंख्यांक महामंडळावर नियुक्तीसाठी जिल्ह्यातील नेत्यांकडे साकडे.
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर येथील उच्चशिक्षित व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर व मौलाना आझाद यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यातील आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले काँग्रेसचा सच्चा शिपाही म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. राशिद सुलतान शेख यांची यावेळी राज्यातील महाविकास आघाडीच्या कोट्यातील काँग्रेस पक्षाकडून अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या विविध महामंडळ पैकी कोणत्या मंडळावर नियुक्ती होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेस पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाचे ज्वलंत प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना तडीस नेणे बरोबर त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणारे राशीद शेख हे एक सक्षम व अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांची जाण असणारे समाजातील युवा व ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे बरोबर समन्वय साधून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र झटणारे राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते असून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यावर अपार निष्ठा असणारे व काँग्रेसचे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रणिती ताई शिंदे व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत.
युवक काँग्रेसच्या चळवळीपासून पक्ष संघटनेला वाहून घेणारे राशीद शेख काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. जनशक्ती युवा विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे समाजातील गोरगरीब वंचित घटकावर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवून राज्य शासनासमोर आक्रमकतेने मांडून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या या ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्याला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक विभागाच्या महामंडळावर राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काम करण्याची संधी मिळाल्यास पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्यांक समाजाचे संघटन मजबूत होणार आहे.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कोट्यातून राशिद शेख यांच्या रूपाने ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी समाजातील ज्येष्ठ नेते याबरोबर कार्यकर्ते पदाधिकारी व सर्वसामान्य जनतेमधून मागणी जोर धरत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा