औराद जिल्हा परिषद गटातून अकबर दावलजी शेख उतरणार राजकीय आखाड्यात... - दैनिक शिवस्वराज्य

औराद जिल्हा परिषद गटातून अकबर दावलजी शेख उतरणार राजकीय आखाड्यात...



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतीनिधी
सोलापूर (औराद ) : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद जिल्हा परिषद गट व गण असलेल्या  भागातून औराद होनमुर्गी येथील चळवळीतील  सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अकबर दावलजी शेख यंदा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुक लढवणार असल्याची चर्चा रंगत आहे.
    अकबर शेख सामाजिक क्षेत्रात अग्रेसर  आहेत. त्यांची संघर्ष करण्याची क्षमता व आत्मविश्वासाचा आवाका मोठा आहे.मागील पाच वर्षांपासून ते शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्न  शासन दरबारीं मांडून तडीस नेले आहे. त्याच बरोबर राज्यतील नॉन बँकिंग कंपन्याच्या अडचणी  सोडवण्यासाठी  केलेला प्रयत्न वखाण न्याजोगे आहे. .आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेळोवेळी समाजातील विविध विषयांवर आपले रोखठोक मत मांडणारे व औराद होनमुर्गी राजूर च्या समस्यां घेवून ग्रामपंचायत प्रशासनाला काम करण्यासाठी भाग पाडणारा एक सच्चा समाजसेवक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
         
       याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता औराद झेड पि लढवण्यासाठी अकबर शेख यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads