आजचे राशिभविष्य दि.12/12/2021
मेष-
अनावश्यक खर्च होईल. परावलंबी स्वभावामुळे कामांमध्ये अडचणी येतील. आळस सोडायला हवा, तरच परिस्थिती सुधारेल. स्पर्धा, ईर्ष्या मनःस्ताप देतील.
वृषभ-
मनासारख्या घटना घडल्यामुळे आजचा दिवस आनंददायी असेल. भरभराटीचा व लाभदायक दिवस ठरेल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल.
मिथुन-
संकल्प पूर्णत्वाकडे जातील. मेहनत व चिकाटीला यश येईल. जबाबदारी वाढेल. अधिकारामध्ये वाढ होईल. गृहसौख्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील.
कर्क-
जुने रोग उद्भवतील. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. छातीसंबंधित आजार होण्याची शक्यता आहे. प्रतिकार शक्ती कमी होईल.
सिंह-
पूर्वनियोजित कामांमध्ये अडचणी येतील. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आत्मविश्वास कमी करणार्या घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडू देऊ नका.
कन्या-
प्रेम प्रणयाचा अनुभव येईल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. प्रतिष्ठा लाभेल. कौटुंबिकद़ृष्ट्या सौख्यकारक दिवस जाईल.
तुळ-
आज आपले आरोग्य उत्तम राहील. आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. शत्रूपीडा कमी होईल. सौख्यकारक दिवस जाईल.
वृश्चिक-
दुःखदायक घटनांचा अनुभव येईल. मनाविरुद्ध घटना घडतील. कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना सावधानता बाळगा. प्रतिष्ठा पणाला लागेल.
धनु-
अनावश्यक भीती, आत्मविश्वास कमी करेल. पोटासंबंधित व्याधी निर्माण होतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा.
मकर-
चुरशीच्या कामांमध्ये जय प्राप्त कराल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमध्ये लाभ होतील. आज उत्तम वस्त्रांची खरेदी कराल. जीवलगांचा सहवास लाभेल.
कुंभ-
आर्थिक अडचणी निर्माण होतील. कर्जदार तगादा लावतील. मानहानीचे प्रसंग मनःस्ताप देतील. वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे.
मीन-
भाग्यकारक घटनांमुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. नव्या मित्रमंडळींची ओळख होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा