10 वी व 12 वी वाढीव क्रीडा ग्रेस गुणाचे प्रस्ताव सादर करावेत..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर दि.24 :-इ. १० वी सन २०२१-२२ परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थाच्या बाबतीत त्यांचा इयत्ता ७ वी व ८ वी मधील कीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय प्राविण्य प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक: मिळविणे आवश्यक आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य किया सहभाग असणे आवश्यक आहे.
इ. १२ वी सन २०२१-२२ परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थाच्या बाबतीत त्यांचा इयत्ता ९ वी व १० वी मधील क्रीडा स्पर्धेत जिल्हा विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्राविण्य प्रथम/व्दितीय/तृतीय क्रमांक मिळविणे आवश्यक आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य किंवा सहभाग असणे आवश्यक आहे. इ.१० वी व १२ वी च्या शाळेने खेळाडूचे विहीत प्रपत्र भरून सोबत रिसिट(हॉल तिकीट), क्रीडा प्रमाणपत्र, इत्यादि कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. इ. १२ वी च्या खेळाडूने १० चे मार्क लिस्ट किंवा बोर्ड प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. प्रत्येक खेळाडूचा प्रस्ताव स्वतंत्र देण्यात यावा मेल किंवा व्हॉटसपवर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. प्रत्यक्ष गेस गुणाचे प्रस्ताव कार्यालयात जमा करावेत
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ.१० वी व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. १२ वी परीक्षेस प्रविष्ठ होणा-या जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय, आंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळेने आपले प्रस्ताव दि. २८ फेब्रुवारी ते २४ मार्च २०२२ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, टि.व्ही. सेंटर समोर, सोलापूर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा