विनापरवाना वृक्षतोड करुन अवैध्य वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई.... - दैनिक शिवस्वराज्य

विनापरवाना वृक्षतोड करुन अवैध्य वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई....


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी                                            सोलापूर दि.24 :- गुप्त माहितीवरुन बार्शी परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या बार्शी ते उस्मानाबाद रोडवरील मौजे नारी या गावाजवळ वनपाल वैराग, वनरक्षक चिंचोली फिरती करत असताना टाटा टेंम्पो407 क्रमांक एम.एच.12 ए.यू.3921 मध्ये बिनापरवाना वृक्षतोड करुन व अवैध्य वाहतूक करताना चिंच या प्रजातिचे इमारती नग जळावून सरपन पकडून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 2014  31 आणि 82, भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 41 (अ) व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये संबंधीत आरोपी यांचेवर कारवाई करुन संबंधित आरोपी श्री. हुसेन महंमद सय्यद वय 46 वर्षे, आगड गल्ली, नाझ हॉटेल पाठीमागे,उस्मानाबाद यांना ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल जप्त केलेला आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक, सोलापूर वन विभाग यांनी दिली आहे.

दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11.00 वाजणेच्या सुमारास बार्शी ते उस्मानाबाद रोडवरील मौजे नारी या गावाजवळ आयशर (1059) कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.04 एफ.डी. 1167 मध्ये लिंब या प्रजातिचे इमारती नग 10 विनापरवाना वृक्षतोड करुन व अवैध्य वाहतूक करत असताना पकडून महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 41  1(अ) व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये संबंधीत आरोपी यांचेवर कारवाई करुन संबंधित आरोपी श्री. उमेश बबन मोरे वय 28 वर्ष मौजे नारी ता. बार्शी जि. सोलापूर यांना ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदरची कारवाई श्री .एल. ए. आवारे सहाय्यक वसंरक्षक रोहयो सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.जे.जे. खोंदे वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी , श्री. .इरफान काझी वनपरिमंडळ अधिकारी वैराग, श्रीमती ए.बी.सोनके वन रक्षक चिंचोली व इतर सर्व वनकर्माचारी पथक यांनी ही कारवाई पुर्ण केली. पुढील तपास चालु आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads