ई-पीक पाहणीचा रब्बी हंगाम कालावधीस 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ..
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर, दि.24:- ई- पीक पाहणी हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सद्यस्थितीमध्ये सुरू असल्याने रब्बी हंगामाच्या पिक पाहणीच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणीचे हे अपडेट व्हर्जन गुगल प्ले स्टोअर उपलब्ध करून दिले असून यापूर्वी रब्बी हंगामाची प्रत्यक्ष ईपीक पाहणी मोबाइल अँपद्वारे करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2022 ही अंतिम दिनांक निश्चित करून देण्यात आली होती. परंतु उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई पीक पाहणी जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांनी रब्बी हंगाम ई पीक पाहणी करण्यास दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली आहे.
तरी जिल्ह्यातील सर्व तहसिलदार तलाठी, मंडळ अधिकारी,कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी आणि समाज शेतकरी बांधवांनी या पिक पाहणीच्या मुदतवाढीचा लाभ घेऊन या रब्बी हंगामामध्ये जास्तीत जास्त पीक पाहण्याची नोंद मोबाईल ॲप द्वारे नोंदविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा