महाराष्ट्र
माण देशी फौंडेशन कडून सातारा कारागृहामध्ये आवश्यक वस्तूंचे वाटप...
सातारा प्रतिनिधी - रविना यादव
दि.२४ फेब्रुवारी - सातारा जिल्हा कारागृहातील बंदीसाठी दैनंदिन कामकाजाकरिता आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप माण देशी फौंडेशन, म्हसवड संस्थेच्या वतीने करण्यात आले असून यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल समवेत धर्मादाय आयुक्त श्री. सुभाष फुले उपस्थित होते.
सातारा जिल्हा कारागृहासाठी आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यासंबधीचा प्रस्ताव मा. अधीक्षक, सातारा जिल्हा कारागृह वर्ग -2 याच्यां वतीने सार्वजनिक न्यासास करण्यात आला. ही बाब माणदेशी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांचे दृष्टीक्षेपास आल्याने नेहमीच समाजात राहून समाजीक कार्य करणाऱ्या चेतना सिन्हा यांनी बंदीजनासाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी बोलताना धर्मादाय आयुक्त म्हणाले की जर कारागृहातील कैद्यांना रोजगार उपलब्ध झाला, तर बाहेर आल्यानंतर ते उर्वरित आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतील व त्याच बरोबर जिल्हा प्रमुख यांनी बोलण्याची सुरुवात करताना, मान्यवर व मित्रजन असे कैद्यांना उद्देशून संबोधले, शिवाय झाले गेलं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करावी.
त्याच बरोबर श्रीमती चेतना सिन्हा या कार्यक्रमात म्हणाल्या, आज मला खूप आनंद होतोय कारण सर्वच बंदिजनांना योग्य ती मदत करण्याची संधी मिळत असून जणू काही एका बहिणीला आपल्या भावाची मदत करण्याची संधीचं मिळते आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
माण देशी फौंडेशन ही एक सामाजिक संस्था असून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात या ठिकाणी कार्यरत आहे. ज्यामधून महिलांना यशस्वी उद्योजिका बनविण्याचे कार्य केले जात आहे. संस्थेने कोव्हिड च्या काळात मास्क, सॅनिटायझर, पी.पी.ई. कीट तसेच जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर वाटप केले असून कोव्हिड पिडीतानां ऑक्सिजन मशीन, मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. शिवाय या पूर्वीही पुणे येथील येरवडा कारागृहातील बंदि महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले आहे. त्याचा लाभ असंख्य कैद्यांनी घेतला .
हीच बाब लक्षात घेवून सातारा कारागृहातील बंदीसाठी दैनंदिन कामाजकाजासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तुंची व साहित्याची भेट देण्याबाबतची आकांक्षा चेतना सिन्हा यांच्या मनात डोकावली व लगेचच त्याबाबतचा ठराव घेण्यात आला आणि कारागृहात दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणऱ्या वस्तू म्हणजेच चहाचा स्टील थर्मास-६ नग, जेवण बनविण्यासाठी लागणारे २ एचपी क्षमतेचे मसाला ग्रायंडर-१ नग, लोखंडी कढई-४ नग , कैद्यांसाठी २०० ब्लॅकेंट, २०० नग सतरंजी, जेवनासासाठी २०० नग प्लेट व २०० नग वाटी त्याचबरोबर मोठी गॅस शेगडी-४ नग व ४०० बंद्याचे जेवण बनविण्यासाठी लागणारे ॲल्युमिनियम पातेले-४ नग यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल व धर्मदाय आयुक्त सुभाष फुले यांचे उपस्थित आज रोजी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यां समवेत धर्मादाय आयुक्त श्री सुभाष फुले, कारागृह अधीक्षक ज्ञानेश्वर दुबे, ॲड. डी. व्हि. कुंभार, माणदेशी फौंडेशन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिंन्हा, मॅनेजिंग ट्रस्टी रेखा कुलकर्णी, अपर्णा सावंत व रवी विरकर, रेश्मा काटकर उपस्थित होत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारागृहाच्या --तेजश्री पोवार, बंदिणी विभाग प्रमुख यांनी केले तर आभार कारागृह अधीक्षक दुबे साहेबांनी मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा