!!हिंदुराज प्रतिष्ठान आयोजित शिवराय मनामनात शिवजयंती घरात बक्षिस वितरण सोहळा संपन्न!!
!!हिंदुराज प्रतिष्ठान आयोजित शिवराय मनामनात शिवजयंती घरात बक्षिस वितरण सोहळा संपन्न!!
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात व जगभरात साजरी झाली. हिंदुराज प्रतिष्ठाणच्या वतीने अमडापुर चिखली तालुक्यात 'घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा...' आयोजित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज हे परत शिवजयंतीच्या निमित्ताने घराघरापर्यंत पोचतील. प्रत्येक घरात त्यांचे स्मरण होईल, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कार्याचा व पराक्रमाचा जागर होईल आणि समाजात समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित होईल... हा या शिवजयंती घरगुती सजावट स्पर्धे मागचा उद्देश होता.
उंद्री येथील CRPF जवान श्री.ज्ञानेश्वर साबळे साहेब यांनी कर्तव्यावर असतांना जम्मूकाश्मीर मध्ये देशविरोधी कारवाया करणाऱ्या २ आतांकवाद्यांना संपवून देशाची मान उंचावली.
त्यांना भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. तो आपल्या संपूर्ण चिखली तालुक्यासाठी गौरवाचा क्षण होता.
आज हिंदुराज प्रतिष्ठाणच्या वतीने CRPF जवान ज्ञानेश्वर साबळे साहेब यांचा सत्कार करण्यात आला व त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष पद म्हणून त्याची उपस्थिती लागली
या कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवलेल्या
स्पर्धकाला पंकज कपाटे यांच्याकडून 2101/-रुपयाचे बक्षीस व ट्रॉफी होती मिळवलेल्या स्पर्धकांचे नाव चि. त्रिनब आनंदराव देशमुख रा चिखली यांनी मिळवला
द्वितीय क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकाला
सूर्यकांत घुगे सर यांच्याकडून 1501/-रुपयाचे बक्षीस होते ते बक्षीस अमडापूर येथील शिवानी कैलास जुमडे हिने पटकावले
तृतीय क्रमांक डॉ निलेश गायकवाड यांच्याकडून 1001/-रुपयाचे होते ते बक्षीस चि आदिश राहुल तांबट या स्पर्धकाने मिळवले
चतुर्थ क्रमांकाचे बक्षिस कृष्णा देशमुख (लल्ला सर )यांच्याकडून 701/-रुपयाचे होते बक्षिस चि सोहम विनायक बगाडे या स्पर्धकाने पटकावले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदुराज प्रतिष्ठान चे अध्यक्ष रामभाऊ बगाडे यांनी केले. त्याचबरोबर हिंदुराज प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व गावातील युवक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते🚩
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा