बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला - दैनिक शिवस्वराज्य

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

💁‍♂️बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये (HSC Board Exam TimeTable) अंशतः बदल करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. 

📍मात्र आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बारावीचे 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे. वेळापत्रकातील दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

▪️दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या.

▪️त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. 

📌पाच आणि सात मार्च या तारखेला जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads