सामाजिक
एम.के.फाउंडेशन कडून गौडगांव (बु) येथील जळीत कुटुंबाला मदत एम.के.फाउंडेशन कडून आत्तापर्यंत जिल्हात सहा पिडीत कुटुंबाना मदत
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
अक्कलकोट : गौडगांव (बु) ता.अक्कलकोट येथील नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनेमुळे शरणबसप्पा पाटील यांचे कुटुंब पूर्णपणे उघड्यावर पडले आहे. अचानकपणे लागलेल्या आगीत पुर्णपणे घर जळून भस्मसात झाले आहे. त्यात जवळपास तीन लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती एम.के.फाउंडेशनचे संचालक रुद्रमुनी हिरेमठ आणि श्रीशैल आहेरवाडी यांनी एम.के.फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांना दिली.
आगीमुळे बाधित झालेल्या पाटील कुटुंब हे सामान्य शेतकरी आहेत. आगीमुळे घरातील संपूर्ण भांडे, धान्य, कपडे, रोख रक्कम तसेच घरातील सर्व वस्तु जळुन खाक झाल्या होत्या. या जळीतामुळे स्वयंपाकासाठी व जेवणासाठी एकही भांडे राहिलेले नव्हते. तसेच धान्य, डाळी सर्व जळुन खाक झाले असून पाटील यांचा संसार कुटुंबासह उघड्यावर पडलेला होता अश्या कुटुंबाना मदतीचा हात द्यावा या हेतूने एम.के.फाउंडेशन च्या वतीने संसार उपयोगी साहित्यांची मदत करण्यात आली.
याप्रसंगी सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजीं यांच्यासह,सिद्धेश्वर साखर कारखाना संचालक शंकर पाटील,मैंदर्गी नगरपालिकेचे नगरसेवक धरेप्पा जक्कापुरे, शरणबसप्पा बमदे, उपसरपंच वीरभद्र सलगरे,मा.सरपंच सिद्धाराम म्हैत्रे, सुर्यकांत अंकलगी,विठ्ठल पाटील,महांतेश्वर पाटील,शामराव पाटील, मल्लिकार्जुन दारफळे,किरण राठोड,सूर्यकांत पाटील,संगमेश्वर पाटील,महांतेश बगले,मल्लिकार्जुन बगले आदी उपस्थिती होते.
यावेळी बोलताना फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री. महादेव कोगनुरे म्हणाले की,पाटील कुटुंबाची परिस्थिती पाहून माणुसकीचे नाते जपत कठीणप्रसंगी एम.के.फाउंडेशन कडून आम्ही मदत केली. आमची फाउंडेशन नेहमी अडचणीत असणाऱ्या माणसांसाठी सेवा देण्यास तत्पर असते. समाजात दुःखीतांचे अश्रू पुसणारे कार्य आम्ही करतोय. झालेली नुकसान भरून निघेल पण जीव महत्वाचा आहे.पाटील कुटुंबाचे सुदैव म्हणावे लागेल की जीवित हानी झाली नाही. समाजातील इतर कुटुंबावर अशी परिस्थिती ओढावू नये,हीच देवाजवळ प्रार्थना.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा