सधन कुक्कुट विकास गट स्थापनेकरिता अर्ज करावेत... - दैनिक शिवस्वराज्य

सधन कुक्कुट विकास गट स्थापनेकरिता अर्ज करावेत...


 समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी                                            सोलापूर दि.24 :-जिल्ह्यातील माढा व सांगोला या दोन तालुक्यातून सार्वजनिक  खाजगी भागीदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करणे या योजनेसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर कार्यालयामार्फत सन 2021-22 करिता राबविण्यासाठी सन 2017-18 अतंर्गत 50 टक्के अनुदानावर पशुपालक लाभार्थ्यांची सर्व प्रवर्गातून प्रति तालुका 1 या प्रमाणे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे.सर्व प्रवर्गातून प्रति तालुका 1 या प्रमाणे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना शासनाचे 50 टक्के अनुदान एकदाच देय आहे. एकुन प्रकल्प किंमत रु.1027500/- पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान म्हणजेच रु.513750/-  शासनाचे अनुदान  देय असून उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थी स्वत:चा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करु शकतील.                                     क

इच्छुक लाभार्थींनी संबधित पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (वि.)/लगतच्या तालुका लघुपशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय/पशुवैकिय दवाखाना श्रेणी-1/2 यांचेशी संपर्क साधुन विहीत अर्जाचा नमुना प्राप्त करुन घेऊन परिपूर्ण अर्ज संबधित पंचायत समिती मध्ये पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे दिनांक 9 मार्च 2022 अखेर सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए.सोनवणे यांनी केले आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads