महाराष्ट्र
ग्रामविस्तार अधिकारी दयानंद पाटील यांचा वाढदिवस कोरवली ग्रामस्थ व डीएम ग्रुप कडून उत्साहात साजरा
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (कामती) : ग्रामपंचायत कॅम्पस मधील सभागृहात ग्रामविस्तार अधिकारी दयानंद पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम कोरवली ग्रामस्थ व डीएम ग्रुप कडून आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी जी.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी जावेद शेख साहेब,डाॅ.अमोल अमोल पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, विकास सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका,आशावर्कर, ग्रामस्थ,सर्व माजी सरपंच, उपसरपंच,शिक्षक व डीएमग्रुप सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचलन कुंभार सर,दत्ता म्हमाणे यांनी केले.आभार प्रदर्शन शशिकांत कस्तुरे यांनी केले.डाॅ.अमोल पाटील, जावेद शेख व सुरेश म्हमाणे यांनी मनोगत व्यक्त करून दयानंद पाटील यांना शुभेच्छा दिल्या.आत्ता पर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचेअभिनंदन केले.गावात विकास कामे होत असल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले.शेवटी दयानंद पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना, विकास कामांचा वेग वाढवणार असल्याचे सांगितले व सर्व ग्रामस्थां कडून सहकार्याची अपेक्षा केली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा