नोकरीविषयक
केंद्र सरकारमध्ये नोकरी हवी आहे? आजच येथे करा अर्ज
केंद्र सरकारची मंत्रालये, संबंधित विभाग आणि केंद्रीय संस्थांमध्ये १९२० पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज १२ मे २०२२ पासून सुरू होणार आहे.
या पदांसाठी भरती प्रक्रिया स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केली जात आहे. कमिशनच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतील.
कमिशन वेबसाइटच्या लॉगिन विभागात अर्जासाठी नोंदणी करून मिळालेल्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग इन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ जून २०२२ ठेवली आहे, तर परीक्षा ऑगस्टमध्ये होणार आहे
स्टाफ सिलेक्शन कमिशनने प्रसिद्ध केलेल्या शॉर्ट नोटिसनुसार, ३३४ श्रेणीच्या पदांसाठी एकूण १९२० रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड फेज १०साठी केली जाणार आहे. या रिक्त जागा फेज १०च्या परीक्षेच्या तीनही स्तरांसाठी आहेत. मॅट्रिक, उच्च माध्यमिक व पदवी आणि उच्च या तीन स्तरांचा त्यात समावेश आहे. विविध स्तरावरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी किमान पात्रता म्हणजे दहावी किंवा बारावी किंवा पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी दिलेल्या कट-ऑफ तारखेनुसार किमान आणि कमाल वयोमर्यादा पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्यासाठी कमिशन निवड पोस्ट फेज १० परीक्षा अधिसूचना २०२२मध्ये अधिक तपशील जारी केले जातील
निवड पद भरती प्रक्रियेमध्ये सामान्यतः कमिशनद्वारे समाविष्ट असलेल्या पदांमध्ये एमटीएस, ड्रायव्हर, वैज्ञानिक सहाय्यक, लेखापाल, मुख्य लिपिक, संरक्षण सहाय्यक तांत्रिक, कनिष्ठ संगणक आदी पदांचा समावेश आहे.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा