आयटीआय पात्रताधारकांना टपाल विभागात नोकरीची संधी; सातव्या आयोगानुसार वेतन
पदांची संख्या
मोटर मेकॅनिकसाठी ५ पदे, इलेक्ट्रीशनसाठी २ पदे, टायरमनसाठी १ पद, लोहारासाठी १ पद रिक्त आहे.
शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात आयटीआय पूर्ण केलेले असणे आवश्यकआहे. तसेच मोटर मेकॅनिक पदासाठी अर्ज असणाऱ्याकडे अधिकृत अनुज्ञप्ती (liscence) असणे आवश्यक आहे.
वेतन
कुशल कामगारांना १९ हजार ९०० रुपये वेतन दिले जाईल.
वयोमर्यादा
१ जुलै २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे असावे. उच्च वयोमर्यादेत एसटीसाठी ५ वर्षे, ओबीसी नॉन-क्रिमी लेयरसाठी ३ वर्षे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३५ वर्षांपर्यंत सवलत असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेच्या अभ्यासक्रमासह परीक्षेची तारीख आणि ठिकाण उमेदवारांना पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर स्वतंत्रपणे दिले जाईल.
अर्ज कसा करायचा ?
अर्ज स्पीड पोस्टने किंवा नोंदणीकृत टपालाने वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, १३४-ए, एसके अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८ वर पाठवावेत. अधिक माहितीसाठी भारतीय टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा