रक्षाबंधन दिवशी घडवली भाऊ बहिणीची भेट
वडूज दि-11/08/2022
सातारा प्रतिनिधी-रविना यादव.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आज हुतात्मा परशुराम विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज च्या वतीने जनजागृती पथनाट्य वडूज बस स्थानकात सादर होत होते
या दरम्यान कर्नाटक राज्यातील एक कुटुंब वडूज इथे कामानिमित्त राहत आहे त्यांच्या कुटुंबातील एका पुरुषाने ते अडीच वर्षाचे बाळ त्या ठिकाणी प्रा सौ शेळके यांच्या स्वाधीन करून निघून गेले
जवळपास अर्धा तास ते बाळ पथनाट्य पाहत होते
पथनाट्य संपले तरी या बाळाचे पालक येत नाहीत म्हणून सौ शेळके मॅडम यांनी त्यांचे सरकारी बंधू एन सी सी अधिकारी श्री राजेंद्र जगदाळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली
तात्काळ जगदाळे सर यांनी स्टॅण्ड वरती असणाऱ्या ध्वनी क्षेपकवरून या बाळाची माहिती दिली पण जवळपास वीस मिनिटे होऊन गेली तरी कोणी येत नाही म्हणून आपले सहकारी शिक्षक श्री ज्ञानेश्वर लहारे, श्री रविंद्र एलमर, प्रा पंकज पवार, शिपाई श्रीरंग दुबळे, याना मदतीला घेऊन पालकांचा शोध घेतला
त्यानंतर त्या बाळाची आई समोर आली आणि भरल्या डोळ्यांनी आपले बाळ कुशीत घेतले
आज रक्षाबंधन दिवशी माझ्या बाळाची बहिणीशी भेट घडवून आणली त्याबद्दल श्री जगदाळे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यां ना धन्यवाद देऊन बाळाला घेऊन गेली
वडुज स्टॅण्ड ला पोलीस चौकी आहे मात्र त्यात पोलीस नसतात अशी खंत प्रवाश्यांमधून व्यक्त होत होती
या साहसी कार्याबद्दल माझी जिल्हा परिषद सदस्य अशोक आबा गोडसे, नंदकुमार गोडसे, वडूज नगरपंचायत चे हुतात्मा परशुराम विद्यालयाचे माझी विध्यार्थी आणि विद्यमान नगरसेवक यांनी सर्वाना धन्यवाद दिले
हुतात्मा चे उप प्राचार्य श्री महेश गोडसे यांनी जगदाळे सर आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन केले
स्वतंत्र दिनी अश्या धाडसी शिक्षकांचा सन्मान व्हावा असे मत संजय गांधी निराधार योजनेचे माझी अध्यक्ष विजय शिंदे यांनी व्यक्त केले
आपले बाळ सापडले हा आनंद आईच्या चेहऱ्यावर पाहताना अनेक प्रवासी भगिनींच्या डोळ्यात अश्रू आले
अश्या सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना समाजाने योग्य सन्मान द्यावा हीच एक माफक अपेक्षा
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा