स्वरांजली कला पथक यांच्या वतीने वडापूर येथे ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे हर घर तिरंगा याबद्दल प्रबोधन व मार्गदर्शन - दैनिक शिवस्वराज्य

स्वरांजली कला पथक यांच्या वतीने वडापूर येथे ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे हर घर तिरंगा याबद्दल प्रबोधन व मार्गदर्शन


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : वडापूर ता. द. सोलापूर या येथे स्वरांजली कला पथक यांच्या वतीने वडापूर येथे ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे हर घर तिरंगा याबद्दल प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले.
  75 वा अमृत महोत्सवानिमित्त भारतभर प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर दि. 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 पर्यंत तिरंगा झेंडा फडकवून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना ग्रामस्थांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा किती तारखेपासून किती तारखेपर्यंत कशा पद्धतीने फडकावायचा याबद्दल ग्रामस्थांचे प्रबोधन व मार्गदर्शन करण्यासाठी वडापूर ग्रामपंचायत च्या वतीने सोलापूर येथील सुप्रसिद्ध स्वरांजली कला पथक यांच्या वतीने वडापूर ग्रामपंचायत कार्यालय समोर ग्रामस्थांना पथनाट्याद्वारे माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.
 या कार्यक्रमास औदुंबर कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी, आनंदा पाटील, अवधू पुजारी, पोपट पाटील, अर्जुन लटके, तुळशीराम भोई, रिपब्लिक सेना सोलापूर जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे, कोतवाल बसवंत सुतार, सतीश दोरकर, ग्रामपंचायत शिपाई आप्पा पारसे, भीमराव कोळी, बशीर फुलारे व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते. 


Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads