स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत एनकूळ गावचा यश तुपे चा डंका - दैनिक शिवस्वराज्य

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत एनकूळ गावचा यश तुपे चा डंका


सातारा प्रतिनिधी -रविना यादव

    छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ वडूज चे दादासाहेब जोतिराम गोडसे कला,वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय वडूज रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत हुतात्मा परशुराम विद्यालय वडूज चा एन.सी.सी कॅडेट यश तुपे या  विद्यार्थ्यांने १४ ते २५ वयोगटात पाच किलोमीटर धावून सहाव्या क्रमांकाचे यश संपादन केले.
   इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेला यश दररोज दहा किलोमीटर धावतो.
मनात जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे आपण सेनादलात जाऊन चाळीस किलोमीटर बीपीटी पूर्ण करणार असल्याचे त्याने बोलून दाखवले.
    खटाव तालुक्यात एनकुल गावाचा हा विध्यार्थी वडूज च्या हुतात्मा परशुराम विद्यालयात खास एन सी सी मिळावी म्हणून प्रवेश घेतला आहे. ज्या दिवशी एन.सी सी.ची निवड चाचणी झाली त्या दिवशी चारशे मुलात त्याने प्रथम क्रमांक मिळवून एन.सी.सी लिस्ट मध्ये आपले नाव समाविष्ठ करून घेतले.
    भारतीय सैन्यदळविषयी आवड असल्याने तो सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
यश चे प्रयत्न लक्षात घेऊन त्याला प्रोत्साहन म्हणून आज विद्यालयात वडूज शिक्षण विकास मंडळ आणि उप मुख्याध्यापक श्री महेश गोडसे, पर्यवेक्षक दिलीप फडतरे, सौ भारती माने, श्री चंद्रकांत पंडित, एस.आर.जाधव, एन.सी.सी. ऑफिसर राजेंद्र जगदाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्चारी आदींनी अभिनंदन केले व यश ला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads