अंत्रोळी ता. द.सोलापूर येथे पवनपुत्र गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रीची पूजा मान्यवरांच्या हस्ते संपन्न.. - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी ता. द.सोलापूर येथे पवनपुत्र गणेशोत्सव तरुण मंडळाच्या श्रीची पूजा मान्यवरांच्या हस्ते संपन्न..


समीर शेख प्रतिनधी
 सोलापूर (मंद्रूप) : अंत्रोळी ता. द.सोलापूर येथे दिनांक 6 सप्टेंबर रोजी पवनपुत्र गणेशोत्सव तरुण मंडळाची श्रीची पूजा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
  यावेळी मंद्रूप पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमित करपे, सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे, मंद्रूपचे उद्योगपती मळसिद्ध मुंगळे, उद्योगपती रमेश आसबे, सभापती प्रशांत कडते, प्रगतशील बागायतदार झांबरे पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष गजीनाथ शेजाळ,उपसरपंच खरात, ग्रामपंचायत सदस्य बाबा बंडगर,इनुस भाई शेख, ब्रह्मदेव सलगरे, अजय कर्वे ,सतीश कर्वे,भारत बंडगर, राम कर्वे , प्रकाश कोकरे सर, स्वप्निल वाले,आनंदा कर्वे, नागनाथ कोळी, सरफराज शेख, पोलीस पाटील फिरोज शेख, चंद्रकांत कोकरे, कंदलगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय जााधव, आप्पासाहेब सलगरे ,खंडू बंडगर,संजय कर्वे ,लक्ष्मण कर्वे, बंडु कर्वे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
    यावेळी पवनपुत्र गणेशोत्सव तरुण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मान्यवरांचा शाल , फेटा , श्रीफळ,व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
  महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजे गणेशोत्सव गेले दोन वर्षं कोविड निर्बंधामुळे मर्यादीत स्वरुपात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा केला होता. आता कोविड निर्बंध हटवल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
यावेळी मंद्रूपचे उद्योगपती मळसिद्ध मुंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकरे सर यांनी केले. 
   तसेच यावेळी पवनपुत्र गणेशोत्सव तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी,व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads