स्वयंभू शिवभूमी नागनाथवाडी येथे भक्ताना शुद्ध पाणी पुरवठा. - दैनिक शिवस्वराज्य

स्वयंभू शिवभूमी नागनाथवाडी येथे भक्ताना शुद्ध पाणी पुरवठा.


सातारा प्रतिनिधी:'- रविना  यादव 


(नागनाथवाडी) अनादी काळापासून प्रत्यक्षात नागनाथवाडी येथे श्रावण महिण्यात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शिवशंकर नागराजाच्या रुपात प्रकट होऊन भक्तांना दर्शन देतात.
             अशा नागनाथवाडीत जर श्रावणी सोमवारी मोठी यात्रा भरते महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍या तून शिवभक्त नागनाथाच्या दर्शनासाठी येतात . या भक्तांना स्वच्छ निर्मळ पाणी मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायत नागनाथवाडी यांचे प्रयत्नाने पाण्याचा मोठा रेफरिजरेटर देवस्थानला देण्यात आला . 
             या योजनेचा शुभारंभ नागनाथवाडी शाळेचे माजी शिक्षक व दहिवडी चे केंद्रप्रमुख श्री नारायण राव आवळे साहेब यांचे शुभहस्ते करण्यात आला.
     यावेळी नागनाथ सेवा विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर घाडगे विश्वस्त नंदकिशोर खापे सागर घाडगे कुंडलिक ननावरे नितीन घाडगे शिवाजी यादव अशोक गुरव शिवाजी गुरव गजानन गुरव राहुल फडतरे धिरज फडतरे सागर खापे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads