गौरी आगमनाने व विसर्जनाने गणेशउत्सवात् चैतन्य.
सातारा प्रतिनिधी-रविना यादव.
(वडूज) शूभ कामाचे व दूख़द प्रसंगावेळी भक्ताच्या हाकेला धाऊन येणारे अखंड जगाचे आराध्य दैवत श्री गणरायाचा गणेश ऊत्सव साजरा होत असताना, मागील दोन वर्षी कोरोनाचे ग्रहण लागले.परंतु चालू वर्षी पूर्ण जोमाने व उत्साहाने सर्व गणेश भक्तांनी गणेश उत्सव साजरा करत आनंद द्विगुणित केला आहे.त्यास योग्य वेळी प्रशासनाने साजरा करण्यास संमती देऊन महत्वाची भूमिका बजावली.
याचं धर्तीवर वडूज येथील दहिवडी रोड ला राहणारे श्रीमती स्वाती प्रभाकर खटावकर,गौरव प्रभाकर खटावकर ( तलाठी- मायणी) यांचे घरी देखील दरवर्षी गणेश उत्सवात गौरी आगमनाचा सुरेख देखावा पाहायला मिळतो,
दरवर्षी वेगवेगल्या पद्धतीने सजावट करत गणेश व गौरी उत्सवाला साजरा केला जातो,या मधे गजलक्ष्मी ,मंगळागौर खेळणारी,हिमालय पर्वत,केदारनाथ, बद्रीनाथ, रायगड किल्ला प्रतिकृती पहावयास मिळतात.
तर पेडगाव रोड येथील श्री. बाजीराव गणपत हजारे (नाना),व सौ.दमयंती बाजीराव हजारे(नानी)यांचेकडे देखील वेगवेगळे देखावे पहावयास मिळतात ज्यामधे गोकूळातील यशोदा मैय्या कृष्णाला लोणी खाऊ घालताना,तसेच कृष्ण जन्म देखावा, कोरोना देखावा, निसर्गरम्य देखावा असे अनेक देखावे पाहण्यासाठी परिसरातून अनेक जन गर्दी करतात.
अश्या गौरी चा आज जड अंत करणाने भाविक निरोप घेणार.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा