कार्तिकी वारी बंदोबस्तात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पथकाची कामगिरी ; सी.आर.पी.सी 109 प्रमाणे एकूण 26 संशयित इसमांवर कडक प्रतिबंधक कारवाई... - दैनिक शिवस्वराज्य

कार्तिकी वारी बंदोबस्तात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पथकाची कामगिरी ; सी.आर.पी.सी 109 प्रमाणे एकूण 26 संशयित इसमांवर कडक प्रतिबंधक कारवाई...


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : श्री. क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी वारी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मोठया संख्येने भाविक येत असतात. सदर भाविकांच्या गर्दीमध्ये काही दृष्ट प्रवृत्तीचे देखील लोक सामिल होवून भाविकांचे पैसे, मोबाईल, किंमती वस्तू इत्यादी साहित्याची चोरी करण्याच्या उद्देशाने येतात. अशा दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून भाविकांना त्रास होवू नये, त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली बंदोबस्त नेमला होता. पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुहास जगताप यांनी सदर चोरटयांचा बंदोबस्त करण्यासाठी पोसई सुबोध जमदाडे, व सहा.पोलीस उपनिरीक्षक बिराजी पारेकर यांचे समवेत स्थानिक गुन्हे शाखेतील गुन्हेगारांची माहिती असणारे पुरूष व महिला अंमलदार यांची 02 पथके तयार करण्यात आली होती.
     सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी साध्या कपड्यांमध्ये व वेश पालटून गर्दीमधील चोरटयांवर लक्ष देवून वारक-यांचे साहित्य उचकटणारे लोकांचा शोध घेवून एकूण 26 संशयित इसमांवर सी.आर.पी.सी. कलम 109 प्रमाणे त्यांचेवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 
   सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, यांचे नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस अंमलदार बिराजी पारेकर, शिवाजी घोळवे, श्रीकांत गायकवाड, सर्जेराव बोबडे, धनाजी गाडे, प्रकाष कारटकर, परशुराम शिंदे, विजयकुमार भरले, मोहिनी भोगे, अनिसा पटेल, लालसिंग राठोड, अजय वाघमारे, अक्षय डोंगरे, विनायक घोरफडे, रामगुडे, समर्थ गाजरे, देवकते, चालक प्रमोद माने, यांनी बजावली आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads