महाराष्ट्र शासनमान्यता पत्रकार संरक्षण समिती जळगाव जिल्हाध्यक्ष आत्मारामजी गायकवाड यांच्या हस्ते जामनेर येथील पत्रकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
जामनेर येथे आज दि ६ नोहेंबर रोजी ठीक सकाळी ११ वाजता बी . ओ .टी कॉम्प्लेक्स येथे बैठक घेण्यात आली . महाराष्ट्र शासन मान्यता पत्रकार संरक्षण समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष आत्मारामजी गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र देऊन सत्कार सन्मान सोहळा संपन्न झाला.
नुकत्याच पत्रकार संरक्षण समिती जामनेर तालुका कार्यकारिणी गठित करण्यात आलेली असून. या नुतन कार्यकारिणी पत्रकार संरक्षण समिती जामनेर. तालुका अध्यक्ष बाळु वाघ , उपाध्यक्ष, किरण चौधरी , सदस्य शांताराम झाल्टे , सदस्य ,नितीन इंगळे , सदस्य, करण साळुंके, फराज अहमद शेख फारुक,अलीयार खान , इमरान खान तसेच सर्व सदस्य यांचा
सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जामनेर तालुका अध्यक्ष . बाळु बाघ . उपाध्यक्ष किरण चौधरी होते. या सन्मान सोहळा कार्यक्रमात सर्व पत्रकारांना ओळखपत्र व फुलगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकार समितीचे जामनेर तालुका अध्यक्ष बाळु वाघ यांनी समितीचे ध्येय व धोरणे हे पटवून सांगितले व पत्रकारांच्या भविष्यासाठी काय उपाययोजना करता येतील या बाबतीत माहीती दिली. या सन्मान सोहळ्याला कार्यक्रमाला समितीतीचे सर्व जामनेर सदस्य ' पदाधिकारी उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा