महाराष्ट्र
निवाऱ्यासाठी गायरानामध्ये अतिक्रमण केलेल्या भूमीहिनांसाठी टोकाची लढाई - नेताजी अवघडे
समीर शेख प्रतीनिधी
मंगळवेढा :- माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गायरानातील अतिक्रमणे निष्काशीत करण्यासाठी राज्य शासनाने निर्देश दिले असले तरी माननीय उच्च न्यायालयाचा आम्ही आदर करतो याचा अर्थ असा नाही सगळंच कायद्याने केले पाहिजे काही ठिकाणी परिस्थिती बघून कायदा आणि व्यवहार याची सांगड घातली पाहिजे हा मुद्दा लक्षात घेऊन "गावात घर नाही, रानात शेत नाही" अशा गरीब आणि गरजू लोकांनीच गायरानावर निवार्यासाठी अतिक्रमण केल्याचे खात्री करून मायबाप शासनाला आमची विनंती आहे ज्या भूमीहीनांनी फक्त निवाऱ्यासाठीच गायरानात अतिक्रमण केलेले आहे यांच्यासाठी शासनाने माननीय उच्चा न्यायालयांस फेरविचार करण्याची याचिका दाखल करावी व या गोरगरिबांचे संसार उघड्यावर येऊ नयेत याची काळजी घ्यावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद भूमी हिनांचे गायरानावरील अतिक्रमणाचे बाबतीत टोकाचा संघर्ष करून न्यायालयीन टोकाची लढाई लढण्यासाठी रस्त्यावर उतरेल आणि याला पूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य नेताजी अवघडे यांनी प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे बोलताना नेताजी अवघडे म्हणाले की, ज्या, ज्या भूमीहीनांनी निवाऱ्यासाठी गायकानांमध्ये अतिक्रमण केलेले आहे अशा लोकांनी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे ताबडतोब आपली नावे नोंद करावीत व भूमीहिन असल्याचा दाखला काढून ठेवावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा