महाराष्ट्र
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी ; दरोडय़ाच्या गुन्हयातील आरोपींना केले जेरबंद..
समीर शेख प्रतिनिधी
इंदापूर : पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल यांनी इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीत लाखेवाडी ता. इंदापुर जिल्हा पुणे येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी रात्रीचे सुमारास अशोक कुबडे यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 3,33,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या वेगवेगळ्या टीम्स तयार करून व प्रत्येक टीमला गुन्हा उघडकीस आणणे कामी सूचना दिल्या सदर गुन्ह्याचा तपास सूचनेप्रमाणे करत असताना पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सदरच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने तपास पथक तयार करून व तांत्रिक विश्लेषणाचा अभ्यास करून वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे तसेच गोपनीय बातमीदाराच्या बातमीच्या आशयाने सदर गून्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी करून तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी रिजवान उर्फ रियाज सुलेमान जहागीरदार वय वर्ष 22 राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर, प्रवीण उर्फ डागर छगन भोसले वय वर्ष 20 राहणार नेवासा फाटा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांना अटक करण्यात आली असून इंदापूर पोलीस स्टेशन गु.र.नं.880/2022 भा.द.वी. क 395,323,504,506 ,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून वरील दोन इसम यांना ताब्यात घेऊन त्याची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी इंदापूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी गणेश इंगळे यांच्या मागदर्शना खाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, स.पो.नी सचिन काळे,
स.पो.नी. धनवे, पो.स.ई. गणेश जगदाळे, पो.स.ई.अमित सिदपाटील, सहा.फौज बाळासाहेब कारंडे, सहा.फौज रविराज कोकरे,पो.हवा. दीपक साबळे,पो.हवा. सचिन घाडगे,पो.हवा. आसिफ शेख,पो.हवा. जनार्दन शेळके,पो.हवा. ज्ञानदेव शिरसागर,पो.हवा. रामदास बाबर,पो.हवा. राजू मोमीन,पो.हवा. अभिजीत एकशिंगे,पो.हवा. स्वप्निल अहिवळे,
पो.ना. योगेश नागरगोजे,पो. कॉ. धीरज जाधव,पो. कॉ. प्राण येवले,चा.सहा.फौज. मुकुंद कदम,चा.पो. काँ. दगडू विरकर यांनी केली आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा