जामनेर शहरात मौलाना आझाद यांच्या जयंती निमित्त शिक्षण दिन संपन्न
दिनांक 11/11/2022 आज जामनेर शहरातील नगर पालिका चौकात भारत रत्न तथा भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण दिन साजरा करण्यात आला. जामनेर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई गिरिश महाजन यांच्या हस्ते मौलान आझाद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन पूजन करुन तसेच उप नगराध्यक्ष श्री महेंद्र बाविस्कर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन आदरांजली व्यक्त करणयात आली. सदर कार्यक्रमात जिकरा एज्युकेशन सोसायटी, जामनेर संचलित जिकरा इंग्लिश मेडियम स्कूल,जामनेर व जिकरा उर्दू शाळा जामनेर यांच्या विद्यार्थ्यांनी आपली कला साद केली.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री विलास राजपूत ,प्रल्हाद बोरसे, कांग्रेस चे तालुकाध्यक्ष श्री शंकर राजपूत, जिकरा एज्युकेशन सोसायटी जामनेर या संस्थेचे सचिव जाकिर शेख, अध्यक्ष रहिम शेख, सामाजिक कार्यकर्ते अशफाकभाई पटेल,हारुनभाई,परवेज भाई, पत्रकार लियकतभाई,जिकरा एज्युकेशन सोसायटी जामनेर चे शिक्षक आसिफ हसनसर,शेख अजिजसर,शेख साबिर सर,सै.बिलालसर, उजेरभाई, एकलव्य शाळेचे शिक्षक भारत रेशवाल तसेच शहरातील असंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.
मौलाना आझाद यांच्या शिक्षण विषयक व देशाभिमानी वृत्तीची आठवण करण्यात आली .
मान्यवरांनी मौलाना आझाद यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा