शेततळे अस्तरीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन... - दैनिक शिवस्वराज्य

शेततळे अस्तरीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन...


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2022-23 मध्ये शेततळे अस्तरीकरण या योजनेसाठी जिल्ह्यास भौतिक 654 व आर्थिक रक्कम रुपये 416.25 लाख लक्षांक प्राप्त झाले आहे. शेततळे प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी एकूण खर्चाच्या 50 टक्के अथवा जास्तीत - जास्त 75 हजार रुपये अनुज्ञेय आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा. शेतकरी समुहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. शासनाच्या इतर योजनेतुन तसेच स्वखर्चाने खोदकाम पुर्ण झालेल्या शेततळ्यांना प्लास्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी अनुदान देय आहे. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads