स्वर्गीय बसण्णा कोगनुरे यांच्या २५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एम. के. फाउंडेशन चे संस्थापक महादेवजी कोगनुरे यांनी निलम नगर येथील शांताई अनाथ आश्रमाला संपूर्ण कुटुंबासह सहकाऱ्यांनी दिली भेट.. - दैनिक शिवस्वराज्य

स्वर्गीय बसण्णा कोगनुरे यांच्या २५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून एम. के. फाउंडेशन चे संस्थापक महादेवजी कोगनुरे यांनी निलम नगर येथील शांताई अनाथ आश्रमाला संपूर्ण कुटुंबासह सहकाऱ्यांनी दिली भेट..


समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर ( मंद्रूप ) : एम. के. फाउंडेशन चे संस्थापक महादेवजी कोगनुरे यांनी आपले वडील स्वर्गीय बसण्णा कोगनुरे यांच्या २५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून निलम नगर हद्दवाढ भाग सोलापुर येथील शांताई अनाथ आश्रमातील लहान निरागस मुलांसोबत संपूर्ण कुटुंबासह व सर्व सहकाऱ्यांसह भेट देऊन मुलांसोबत भोजन केले.

 ह्या निरागस मुलांसोबत जेवण करत असताना एम. के. फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष महादेवजी कोगनुरे म्हणाले की, मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवत होते, कश्या प्रकारे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत माझ्या आई वडिलांनी बालपणी आमच्या सर्व भावंडांचे पालनपोषण केले, मी कमी वयाचा असताना वडील आम्हाला सोडून गेले, पण ते असताना त्यांनी जे आमच्यावर केलेले चांगले संस्कार आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आज असे कार्य करण्यास आम्हास प्रेरणा मिळत राहते. आज ह्या अनाथ मुलांसोबत सोबत वेळ घालवत असताना डोळ्यात एकाच वेळी हसू आणि आसू होते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
    सोबत जेवण करत असताना काही मुलांसोबत संवाद साधला, त्यांच्या भावना ऐकून मनाला खूप वेदना होत होत्या. आठवडय़ातून एकदा तरी चांगल्या हॉटेल्समध्ये जेवणास जाण्याचा हट्ट धरणाऱ्या मुलांना अनाथ जीवन जगणाऱ्या मुलांना एक वेळ जेवणाची भ्रांत कशी असते ह्या परिस्थितीची जाणीव असण्याची गरज आहे, असे ते पुढे बोलत असताना म्हणाले.
   याप्रसंगी वृक्षारोपण करुन मुलांनी प्रार्थना म्हणून जेवणास सुरुवात केली 
    याप्रसंगी राजकुमार सगरे मालक, बंधू भीमाशंकर कोगनुरे, बंधू नागेंद्र कोगनुरे, सावित्री महादेव कोगनुरे, श्रीदेवी नागेंद्र कोगनुरे,बसम्मा पाटील,गायत्री रुद्रमठ,कल्लप्पा आहेरवाडी, सिद्धाराम हंचनाळ, आप्पाशा कोगनुरे,रेवणप्पा बहिरामडगी,भैरांना बहिरामडगी, रेवनु कोनदे,श्रीशैल मामा चडचने,नीलकंठय्या स्वामी,आनंद चोल्ले, शिवा उप्पलवार, शिवाजी राठोड, महांतेश बगले, उमेश मैंदर्गी,अजित पाटील, प्रकाश जत्ती, मल्लिकार्जून बगले,विशाल धोत्रे, श्रीशैल अहेरवाडी, अनाथ आश्रमाचे संचालक गायकवाड व परीवार यांच्या सह मित्र परिवार उपस्थित होता.

आज ज्या प्रकारे आम्ही त्यांच्यासोबात जेवण करून त्यांचा दिवस गोड केला त्याप्रमाणे आपण सर्वांनी ही आपल्या परीने त्यांना आनंद देण्यात खारीचा वाटा उचलावा जेणेकरून त्यांना त्यांच्या आईवडिलांची कमतरता जाणवू नये असे आवाहन महादेवजी कोगनुरे यांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads