तळेगाव,शेळगाव ते शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे
तळेगाव ता. जामनेर ता.३० तळेगाव येथे नुकतीच जय गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थान तळेगाव, शेळगाव तर्फे श्री बालाजी संस्थान श्रीराम मंदिर तळेगाव येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा पायी दिंडी पालखी सोहळा आयोजित केले असुन हे ११ वे वर्षे आहे. तारीख २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी२०२३ दरम्यान पाच दिवसांची पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन २९ जानेवारी वार रविवार रोजी सकाळी ५ः३० वाजता श्रीराम (श्री बालाजी) मंदिर तळेगाव येथे उपस्थित राहावे तळेगाव,शेळगाव नागरिकांनी व भाविक भक्तानी उपस्थित राहुन पायी दिंडीच्या स्वागतासाटी मोठ्या संख्याने हजर राहुन पालखी सोहळाची शोभा वाढवावी असे अव्हाण दिंडी प्रमुख श्री.गजानन सुपडू चौधरी आयोजका तर्फ करण्यात आले आहे.
सदर पदयात्रा नियोजनपूर्वक योग्य व उत्तम सुविधा पुरविता यावी यासाठी भाविकांनी आपली नावे लवकरात लवकर नोंदवावी तसेच बीपी, डायबिटीस, शुगर ,हार्ड पेशंट व इतर आजार असलेल्या पेशंटनी पदयात्रेत आपली नावे नोंदवू नये. असे आव्हान आयोजकातर्फे करण्यात आले आहे. तसेच पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्यांनी सूचनांचे पालन करावे प्रत्येकाने आरतीच्या वेळी हजर राहावे दिंडीमध्ये ध्वजाच्या मागे राहून नामस्मरण करावे कोणाचेही गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही सर्वांनी चहा नाश्ता जेवण वेळेवर घ्यावे ही आपली वैयक्तिक जबाबदारी राहील असे अव्हान
संस्थानचे अध्यक्ष- श्री. श्रावण सोनू कोळी, उपाध्यक्ष - डॉ. गजानन डी.जाधव, सचिव -श्री.प्रमोदकुमार जैन,दिंडी प्रमुख श्री.गजानन सुपडू चौधरी, सदस्य-श्री.नितीन कुमार चोरडिया, डॉ. नरेश सुरेष पालवे, श्री. आत्माराम कोळी, श्री.लखीचंद गोरे, श्री. शेषराव पवार,श्री. भागवत भगत जिरी,श्री. धनराज गायके,श्री. संजय सपकाळ, संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे* दरवर्षी पायी दिंडीचे आयोजन करून संस्थांमार्फत वेगवेगळ्ये धार्मिक कार्यक्रम केले जातत. पायी दिंडी ही तळेगाव,शेळगाव कासली, निमखेडी मार्गे फत्तेपूर व देऊळगाव मुक्काम धामणगाव (बढे), स्थळ गजानन महाराजांचे जन्म स्थान ,टाकळी मुक्काम,शिरवा , कोथळी,पिंपळगाव नाथ, भंडारी 'मुक्काम, निपाना, पिंपळगाव राजा, खामगाव मुक्काम, शेगाव येथे पालखी प्रर्दशन व समाधी दर्शन नंतर विसावा भक्तनिवास येथे मुक्काम असुन २ फेब्रुवारीला सकाळी पायी दिंडीची सांगता झाल्या नंतर परतीचा प्रवास हा आपआपल्या वैयक्तिक जंबाबदारीवर राहिल. पदयात्रा कालावधीत कुठल्याही नैसर्गिक आपत्तीस आयोजक जबाबदार राहणार नाही याची प्रत्येकाने नोंद घ्यावी सर्व सहभागी भाविकांनी प्रामाणिकपणे सहकार्याची व समंजसपणाची भावना ठेवावी व आध्यात्मिक आनंद घ्यावा व सहकार्या करावे असे आव्हान करण्यात आले असून पदर पदयात्रेत नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा 08275343357 / 94 20 558409 पायी दिंडी यशस्वीतेसाठी तळेगाव शेळगाव सर्व भाविक भक्त व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा