महाराष्ट्र
मंद्रूप येथील अप्पर तहसील कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न....
समीर शेख प्रतिनीधी
सोलापूर (मंद्रूप) : दि. 3 जानेवारी रोजी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयामध्ये अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबाळे व नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस तहसीलदार राज शेखर लिंबारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी या कार्यक्रमास तहसीलदार राजशेखर लिंबारे, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे व तहसील कार्यालया मधील सर्व अधिकारी वर्ग रिपब्लिकन सेना सोलापूर जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे व मंद्रूप विभागातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी समाजातील सर्व थरातील लोकांसाठी सामाजिक कार्य तर केलेच आहे पण विशेषता भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना शिक्षण देऊन स्त्रियांचा शिक्षणाचा पाया रचून त्यांचा उद्धार केला व त्यांचा सर्वांगीण विकास केला असे गौरव पर उदगार काढून त्यांना आदरांजली वाहिली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा