महाराष्ट्र
नदी संवाद यात्रेअंतर्गत मार्डीत शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला अभियानांतर्गत मार्डी येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नदी संवर्धन काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा तर चला जाणू या नदीला या विषयावर चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याच्या रूपाने बक्षीस वाटप करण्यात आले.
सोलापूर जिल्हा अभियान" जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती उत्तर सोलापूर व मार्डी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भीमा / सीना /धूबधबी /आदिला नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी श्रीमती बुलबुले तर, प्रमुख अतिथी म्हणून उत्तर सोलापूरचे नायब तहसीलदार विश्वनाथ गुंड होते.
यावेळी उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार, मार्डीचे केंद्रप्रमुख श्री. निम्बर्गी, समन्वयक प्रवीण तळे, जलसंपदा विभागाचे उपअभियंता अमोल गायकवाड, जलसंपदा विभागाचे अभियंता संतोष अडाकुळ, जलसंधारण विभागाचे अभियंता विशाल आखाडे, नदी अभ्यासक राजेश वडीशेरला, वन विभागाचे दीपक खलाणे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक या नदी संवाद यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री. शिंदे यांनी तर विष्णू जगताप यांनी आभार मानले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा