महाराष्ट्र
रियाना शेख यांना मिळावे उपसरपंच पद ; इंदिरानगरकरांची मागणी...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : मंद्रूप येथील इंदिरानगर हा वार्ड नेहमीच विकासापासून वंचित राहिलेला असून येथे आजही उघड्यावर पडलेल्या गटारी, पाण्याची टंचाई, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण कुठलीच सुविधा येथे सुरळीतपणे मिळत नसल्यामुळे या भागातील ग्रामस्थांचे नाहक त्रास होत असून हा वार्ड नेहमीच विकासाच्या विळख्यात पडलेला आहे..
मंद्रूपचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे विकासाच्या दृष्टीने पाहिले तर गावाला येणारा अपुरा निधी विकास कामासाठी अपूर्ण पडत आहे. तसेच इंदिरानगरचा विस्तार देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. विकासाच्या दृष्टीने पाहिले तर या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे.
इंदिरानगरच्या विकासासाठी या भागाला उपसरपंच पद द्यावे, अशी मागणी इंदिरानगरच्या ग्रामस्थातून होत आहे....
इंदिरानगर पूर्वी कोरे गटाचा बालेकिल्ला होता. पण, गतवर्षीच्या निवडणुकीत भाजपने कोरे गटाला धक्का देत आपला झेंडा रोवला. तेव्हापासून हा वार्ड भाजपचा बालेकिल्ला बनला होता. या वार्डातून भाजपला प्रत्येक निवडणुकीत जास्त मताधिक्य मिळायचे.
पण, गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत सर्वसामान्य कुटुंबातील रियाना शेख यांनी भाजपच्या बालेकिल्लाला धक्का देत प्रतिस्पर्धीय भाजप उमेदवाराला आसमान दाखवत अधिक मताधिक्य घेऊन त्याचा पराभव केला. व पुन्हा हा वार्ड कोरे गटाच्या ताब्यात खेचून आणला..
तसेच चालु पंचवार्षिक निवडणुकीत कोरे गटाकडून रियाना शेख यांना संधी देण्यात आली. यावेळी रियाना शेख यांनी पुन्हा भाजपच्या उमेदवाराला आसमान दाखवत त्याचा पराभव करून आपल्या विजयाबरोबर कोरे गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवारला देखील या वार्डातून जास्त मताधिक्य दिले.
कमी कालावधीमध्ये रियाना शेख यांनी इंदिरानगरचा विकास मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला. पंधरा वर्षापासून बंद पडलेले सर्व हातपंप दुरुस्ती केले, हातपंपांना शोषखड्डे, आरोग्य सेवा, अंतर्गत गटार, पाण्याची सोय, बंद पडलेले पथदिवे पुन्हा सुरू केले, रस्त्यावर मुरमीकरण केले, बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना कोरोना काळात पाच हजार रुपयांचा आर्थिक मदत मिळवून दिले. व तसेच त्या कामगारांना रोज दोन वेळेस मोफत जेवणाची व्यवस्था केली.
मंद्रूप व इंदिरानगरचा विकास करण्यासाठी रियाना शेख यांना उपसरपंच पद द्यावे, अशी मागणी इंदिरानगरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
कोरे गटासोबत एकनिष्ठ राहणार..
पॅनल प्रमुखांनी संधी दिल्यास त्या संधीचा सोना नक्कीच करेन,
पॅनल प्रमुख जे आदेश देतील ते मला मान्य असेल.
उपसरपंच पद देवो अगर ना देवो, कोरे गटासोबत एकनिष्ठ राहणार.
:-रियाना गफूूर शेख, ग्रामपंचायत सदस्या,
इंदिरानगर-मंद्रूप
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा