महाराष्ट्र
मातुर्लिंग गणपती तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करणार :- आ समाधान आवताडे
सलीम शेख प्रतिनिधी.
मंगळवेढा :-सिद्धापूर येथील ग्रामदैवत मातुर्लिंग गणपतीच्या यात्रेनिमित्त श्री ची महापूजा आ समाधान आवताडे यांनी सपत्नीक पार पाडली. यावेळी बोलताना आमदार म्हणाले तीर्थक्षेत्र विकासासाठी जास्तीत जास्त भरीव निधी शासनाकडून मिळवून देऊ .
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी सभापती प्रदीप खांडेकर, प्रणव परिचारक माजी जि प सदस्य बापुराया चौगुले, जि प सदस्य नितीन नकाते, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भीमगोंडा पाटील, माजी संचालक जालिंदर व्हनुटगी, विजयकुमार भरमगोंडे, माजी सरपंच संतोष सोनगे, गंगाधर काकणकी, पोलीस निरीक्षक रणजीत माने यावेळी उपस्थित होते.
स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांनी मातुर्लिंग गणपती ला ब दर्जा तीर्थक्षेत्र मिळवून दिला होता.व भक्त निवास बांधण्यासाठी निधी मिळवून दिले होते.
भाविकांची वाढती संख्या बघता या ठिकाणी नदीवरील पुलासाठी कुडल संगम च्या धरतीवर विकास कामासाठी भरीव निधी मिळावा असे ट्रस्टचे अध्यक्ष पाटील म्हणाले.
यात्रा कालावधीत पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा