महाराष्ट्र
वाजपेयी नानाश्री अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आंतर शालेय पाठांतर व वक्तृत्व स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : 4 जानेवारी 2023 संस्थेचे संस्थापक ऋषितुल्य अग्नि सेवेचे पितामह वाजपेयी नानाश्री अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आंतर शालेय पाठांतर व वक्तृत्व स्पर्धेचे भव्य बक्षीस वितरण समारंभ सोनामाता शिक्षण संकुलनामध्ये पार पडले.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून, व्याहरुती होमाने सुरुवात झाली .प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंतर शालेय वक्तृत्व स्पर्धेचे विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आले.
या आंतरशालेय वक्तृत्व पाठांतर स्पर्धेमध्ये 26 शाळांनी सहभाग घेतला व 230 विद्यार्थ्यां यांची नोंद करण्यात आली.रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. आणि शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीनिवास वैद्य (CA), तसेच कीर्ती लक्ष्मी अत्रे मॅडम संस्था सचिवा, उपाध्य सर संस्था सदस्य, नाहवकर सर संस्था सदस्य, आमडेकर मॅडम संस्था सदस्य, नरहरी अघोर सर मुख्याध्यापक ( माध्यमिक ), राजश्री राजमाने मुख्याध्यापिका (प्राथमिक विभाग), तीप्पांना कलकोटे परिवेक्षक उपस्थित होते.
व कार्यक्रमाचे आयोजन सोनामाता शिक्षण संकुल, सोलापूर ,तिन्ही विभाग प्राथमिक, माध्यमिक, बालवाडी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन कांबळे सर यांनी केले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा