जामनेर तालुक्यातील मादनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिणी पाटील यांची बिनविरोध निवड.... - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील मादनी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रोहिणी पाटील यांची बिनविरोध निवड....

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मादनी येथे रोहिणी प्रफुल पाटील यांची बिनविरोध सरपंच पदी निवड करण्यात आली. जामनेर तालुक्यातील मादनी  ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रोहिणी प्रफुल पाटील यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. रोहिणी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.व त्यांचा सत्कार जामनेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सरपंच रोहिणी पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रोहिणी पाटील यांनी दिली आहे.त्यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत जी बाविस्कर सरचिटणीस रवींद्र झाल्टे शेतकी संघ संचालक नितीन पाटील तुषार पाटील प्रफुल पाटील प्रतीक पाटील माजी सरपंच सपना पाटील प्रतिभा पाटील अक्षय पाटील उपस्थित होते

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads