शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने युवासेनेच्या वतीने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन - दैनिक शिवस्वराज्य

शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने युवासेनेच्या वतीने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
     जामनेर शहरातील शासकीय उपजिल्हा या रुग्णालयातील सर्व रुग्णांसाठी पाणी व फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. प्रशांत महाजन व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
  त्यासोबतच जामनेर शहरातील
तहसील कार्यालय,पंचायत समिती,भूमिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला , सर्व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.शहरातील जि.प.मराठी शाळा, जि.प.उर्दु शाळा,जि.प.गोविंद महाराज संस्थान येथील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शिक्षक मा.मुख्याध्यापक श्री.शांताराम माळी, बाविस्कर सर हे उपस्थित होते.
    या कार्यक्रमाप्रसंगी युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल भाऊ चव्हाण, तालुकाप्रमुख नरेंद्र धुमाळ, शहर प्रमुख विशाल भोई,विशाल वाघ,बबलू चव्हाण,गणेश पांढरे, शशिकांत मिस्तरी, ॲड.प्रकाश पाटील,तुकाराम गोपाळ,उस्मान शेख,अमोल रोकडे,किशन मोरे,काशिनाथ शिंदे,स्वप्नील जोशी इ.शिवसैनिक उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads