एक हजार रुपयाची लाच पुरवठा लीपिकाला भोवली ...पुरवठा लिपिक अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात - दैनिक शिवस्वराज्य

एक हजार रुपयाची लाच पुरवठा लीपिकाला भोवली ...पुरवठा लिपिक अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे

बोदवड -रेशन कार्ड वरील आई च्या रेशन कार्ड वरून   मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करण्यासाठी तक्रारदार पुरुष वय 40 नांदगाव तालुका बोदवड जिल्हा जळगाव यांच्याकडे 1000 रुपयांची लाच घेणाऱ्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  ताब्यात घेतले. उमेश बळीराम दाते वय 55 वर्ष लिपिक पुरवठा विभाग बोदवड जिल्हा जळगाव नाव आहे.तक्रारदाराला नवीन रेशन कार्ड काढायचे होते. व आईचे मुलाचे नाव कमी करण्यासाठी  त्यांनी बोदवड तहसील कार्यालयात अर्ज केला होता. नवीन रेशन कार्ड काढून देण्यासाठी  उमेश बळीराम दाते यांनी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  तहसील कार्यालयात सापळा लावून 1000 रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली. लिपिक उमेश बळीराम दाते यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक सुहास देशमुख, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे जळगाव, स. फौ. दिनेश सिंग पाटील, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने,
कारवाई मदत पथक-
स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे,पो.कॉ.प्रदिप   पोळ,पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर,पो. का सचिन चाटे
 मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक  मा.श्री माधव रेड्डी अप्पर पोलिस अधिक्षक ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा. जिल्हाधिकारी सो जळगाव सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads