संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा जामनेरात सर्वपक्षीय निषेध....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
सतत कोणत्या ना कोणत्या बाबतीत नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे संभाजी भिडे( मनोहर कुलकर्णी ) यांनी पुन्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त तसेच बेताल वक्तव्य करुन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले व थोर संत अथवा महापुरुषांच्या बदल नवीन वक्तव्यामुळे वाद निर्माण होऊन राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
संभाजी भिडे यांना वादत्वरित कार्यवाही करून अटक करावी याबाबतचे निवेदन जामनेर तालुक्यातील क्षत्रिय माळी समाज यांच्या तसेच सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीने शहरातील माळी गल्ली येथील संत सावता महाराज मंदिरापासुन संभाजी भिडेची अंत्ययात्रा काढुन हजारोंच्या संख्येने समाज बांधव व पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते यांनी निदर्शने व आंदोलन केले. चौकात भिडेच्या फोटोस जोडेमार आंदोलन करुन शेण फासुन त्रिव्र आंदोलन करण्यात आले होते. तहसीलदार नानासाहेब आगळे यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समस्त फुले व महापुरुष प्रेमींच्या दुखावलेल्या भावनांचा आदर करुन संभाजी भिडे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून अपमानित केले. संभाजी भिडे यांच्या या मनुवादी प्रवृत्तीला तात्काळ आळा घालुन त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून अटक करण्यात यावी. व संभाजी भिडे वर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अशी मागणी एकमताने करण्यात आलेली आहे. त्यावेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा