खान्देश तेली समाज मंडळाच्या उपक्रमास जामनेर तालुक्यातून भरघोस प्रतिसाद..
जामनेर - खान्देश तेली समाज मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा धुळे शहरामध्ये रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुस्तिकेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच शेजारच्या मध्यप्रदेश,गुजरात राज्यातून अनेक वधू-वरांची माहिती संकलित करण्यात येत असून, महाराष्ट्रभर आवश्यक असलेले परिचय पत्राचे फॉर्म वितरित करण्यात आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून तेली समाजसेवक बंधू-भगिनींचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.जामनेर तालुक्यातील जामनेर लोंढरी,फत्तेपुर,ओझर,पहुर,शेंदुर्णी,गारखेडा,भराडी, तळेगाव,मोयखेडा तसेच अनेक गावांमधून समाजबांधव आपल्या मुलामुलींचे फॉर्म भरून मंडळास सहकार्य करीत असून,मंडळाचे पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. जामनेर तालुक्यातील ज्या ठिकाणी तेली समाज वस्ती आहे अशा प्रत्येक गावामध्ये जाऊन मंडळाचे पदाधिकारी फार्म वितरित करीत आहेत. तसेच समाज बांधवांकडून उपवर मुला-मुलींचे फॉर्म भरून घेत आहेत. समाज बांधवांचे यासाठी पूर्ण सहकार्य मिळत असून खान्देश तेली समाज मंडळाच्या या उपक्रमास जामनेर तालुक्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
बोदवड तालुका अध्यक्ष नितीन प्रकाश चौधरी सर
यासाठी खान्देश तेली समाज मंडळाचे जामनेर तालुका अध्यक्ष श्री अजय अशोक चौधरी, शहराध्यक्ष श्री निलेश सुरेश चौधरी,शेंदुर्णी अध्यक्ष श्री सोपान चौधरी,फत्तेपूर अध्यक्ष श्री अविनाश चौधरी,पहुर अध्यक्ष श्री अनिल मांगो पाटील (बावस्कर), चैतन्य चौधरी लोंढरी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती स्वातीताई चौधरी, शहराध्यक्ष सौ.प्रणालीताई चौधरी,जामनेर तालुका सचिव श्री विलास शालिग्राम चौधरी,अमोल भाऊ बावस्कर पहुर,यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.मंडळाच्या या उपक्रमात सर्व समाजसेवक बंधू-भगिनींनी सहकार्य करावे व आपल्या मुला मुलींचे फार्म भरून द्यावेत असे आवाहन खान्देश तेली समाज मंडळाचे मुख्य सचिव श्री रवींद्र जयराम चौधरी यांनी केलेले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा