रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा – डॉ. सुरेंद्र जैन
आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. गरजू रुग्णांना मदतीचा हात द्या, असा सल्ला डॉ. सुरेंद्र जैन यांनी दिला.
दैनिक शिवस्वराज्य महाराष्ट्र न्यूज पोर्टल ला डॉ.सुरेंद्र जैन यांनी शुभेच्छा दिल्या आहे. ग्रामीण भागातील जनता अत्याधुनिक वैद्यकीय सेवेपासून वंचित आहेत तसेच ग्रामीण रुग्णांना खासगी व महागडय़ा वैद्यकीय उपचारासाठी शहरात धाव घ्यावी लागते.८० टक्के आकस्मिक दुर्घटना आपल्या घरातच घडतात. अशा दुर्घटना झाल्यास त्या हाताळण्यासाठी जीवनात मदतीचे मूलभूत उपाय शिकणे आवश्यक आहे. गरजू रुग्णांना आकस्मिक वैद्यकीय सेवा मिळावी, या सामाजिक संकल्पनेतून डॉ.सुरेंद्र जैन यांनी ग्रामीण भागात तालुक्यात सतत रुग्ण सेवा करत आहे. तीस वर्षापासून रुग्णांना सवलतीच्या दरात अत्याधुनिक सेवा देण्याचा आमच्या रुग्णालयाचा प्रयत्न आहे.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा